पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण | पुढारी

पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण

पाटस : पुढारी वृत्तसेवा : पाटस (ता. दौंड) ग्रामपंचायतीकडून गावात अंदाजे 15 लाख रुपये किमतीचा मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा मुरूम गावातील राजकारण, गट-तट पाहून अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या फायद्यासाठी टाकल्याची चर्चा असून, वाड्या-वस्त्यांवर हा मुरूम पोहचला नसल्याचे तेथील नागरिक बोलत आहेत. हा मुरूम गट-तटाच्या राजकारणामुळे काही रस्त्यांना व नागरिकांच्या वस्तीवर मिळाला, तर काहींना त्या वॉर्डमधील सदस्याने घरचा आहेर दाखवला आहे.

पाटस गावच्या एका ग्रामपंचायत सदस्याकडून मिळालेली माहिती अशी की, गावच्या प्रत्येकी एका वॉर्डमध्ये 57 मुरमाच्या गाडी टाकायच्या आहेत. गावात एकूण सहा वॉर्डरचना असून, 17 ग्रामपंचायत सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याच्या वाट्याला अंदाजे 19 हायवा ट्रक गाड्या वाट्याला आल्या आहेत, असा एकूण मिळून 15 लाख रुपयांचा मुरूम गावात टाकण्याचे काम सुरू असताना अनेक वाड्या-वस्त्यांवर हा मुरूम अद्याप पोहचला नसल्याने ग्रामपंचायत सदस्यावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Back to top button