‘वुशू’त पुण्याच्या खेळाडूंचे यश | पुढारी

‘वुशू’त पुण्याच्या खेळाडूंचे यश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. यात तृप्ती चांदवडकर, सलोनी जाधव यांनी तिहेरी सुवर्णयश मिळविले. तृप्तीने एकेरीत तीन सुवर्णपदक मिळवल्यानंतर सुवर्णविजेत्या सांघिक संघातही तिचा समावेश होता. या स्पर्धेत सान्सू आणि ताऊलू प्रकारात पुणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक पटकावला. मुंबई शहराने दुसरा, तर कोल्हापूरने तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत तृप्तीने चनक्वॉन, जेनशू आणि क्वॉनशू प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

खुशी तेलकरने चनक्वॉनमध्ये रौप्य, दावशूमध्ये सुवर्ण आणि गुनशूमध्ये सुवर्णपदक मिळवले. सलोनी जाधवने ननक्वॉन, नंदाऊ आणि ननगुण प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. श्रावणी कटकेने तायचीक्वॉन आणि तायचीजेन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. कुणाल कोद्रेने झिंगीक्वॉन आणि स्वॉगदाऊ प्रकारात सुवर्णयश मिळवले. निखिल जाधवने अदरस्टाईल आणि सिंगलव्हेपन प्रकारात सुवर्णयश खेचून आणले. स्वराज बडसकरने ननक्वॉन आणि डबलव्हेपनमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.

या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंची निवड गुजरात येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा 28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. यात महाराष्ट्राच्या अकरा खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळवले. श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकर, स्नेहल बडसकर, खुशी तेलकर, निखिल जाधव, कुणाल कोद्रे, राजमल्हार व्हटकर, स्वराज कोकाटे, वैभव पाटील, अथर्व मोडक, ओंकार मोडक यांचा सुवर्णविजेत्या संघात समावेश होता.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : सोमनाथ गुंजाळ (48 किलो) – सुवर्ण, ओंकार वीर (52 किलो) – कांस्य, ओंकार पवार (56 किलो) – सुवर्ण, राहुल पवार (70 किलो) – सुवर्ण, निर्मल शेटे (75 किलो) – रौप्य, अमोल खोत (80 किलो) – कांस्य, निकिता जगताप (45 किलो) – कांस्य, विजया पोळ (48 किलो) – कांस्य, ऋतुजा सुर्वे (60 किलो) – सुवर्ण, अश्विनी बोत्रे (65 किलो) – सुवर्ण, स्नेहल बडसकर – सुवर्ण, मयुर पाडोळे – कांस्य, स्वराज कोकाटे – सुवर्ण. ओंकार मोडक – एक सुवर्ण, एक रौप्य. राजमल्हार व्हटकर – एक सुवर्ण, एक रौप्य. अथर्व मोडक – दोन कांस्य, वैभव पाटील – रौप्य, तेजस राऊस – सुवर्ण, प्राजक्ता

Back to top button