पिंपरी : ‘एमपीएससीसाठी सर्व विषयांचा अभ्यास आवश्यक’ | पुढारी

पिंपरी : ‘एमपीएससीसाठी सर्व विषयांचा अभ्यास आवश्यक’

 

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: एमपीएससी परीक्षेसाठी वेगवेगळे विषय असतात. त्या सर्व विषयांची सखोल माहिती घेऊन परीपूर्ण अभ्यास करणे आवश्यक असते. वर्तमानपत्रातून चालू घडामोडींची सुद्धा तयारी करता येऊ शकते, असे मत एमपीएससी मार्गदर्शक तज्ज्ञ दीपक धनवडे यांनी व्यक्त केले.  जिजाऊ प्रतिष्ठान आकुर्डी यांच्या वतीने एमपीएससी परीक्षा संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनवडे बोलत होते. यावेळी सहायक पोेलिस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे उपस्थित होते.

यावेळी पिंगळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एमपीएससी परीक्षेबद्दल सर्वांगीण माहिती घेऊन एकाग्रतेने त्या परीक्षेची तयारी करावी, जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा. सातत्यपूर्ण प्रयत्नांनी केलेला संघर्षमय प्रवासाचा शेवट हा नेहमी गोड होत असतो, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांबाबत असलेल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिजाऊ प्रतिष्ठान आकुर्डीचे अध्यक्ष अमोल दाभाडे, अमोल गुंड, आशा आवटे, विष्णू आवटे, किरण पाचपांडे यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

Back to top button