भोरला लोक अदालतीत 127 प्रकरणे निकाली | पुढारी

भोरला लोक अदालतीत 127 प्रकरणे निकाली

भोर; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार भोर येथे शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात एकूण 127 प्रकरणे निकाली निघाली. ज्येष्ठ पक्षकारच्या हस्ते दिवाणी व फौजदारी न्यायालयात याचे उद्घाटन करण्यात आले. न्यायालयातील दिवाणी व फौजदारीचे 711 प्रलंबित प्रकरणे आणि 1014 दाखलपूर्व प्रकरणे, अशी एकूण 1725 प्रकरणे या अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

त्यापैकी 64 प्रलंबित आणि 63 दाखलपूर्व प्रकरणे निकाली निघाली. सर्व 127 प्रकरणे या लोक अदालतीत निकाली निघाली असून, यातून 34 लाख 70 हजार 612 रुपये रकमेची वसुली झाली. दिवाणी न्यायाधीश क स्तर दीप्ती सरनायक, सहदिवाणी न्यायाधीश हर्षदा पाटील यांनी पॅनल प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. तसेच अ‍ॅड . सुरेश शिंदे, अ‍ॅड सुनील बांदल, अ‍ॅड अश्विनी टोले-कुलकर्णी, अ‍ॅड विक्रम घोणे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.

Back to top button