पुणे : उपवास करा, पण आरोग्यदायी! आहार तज्ज्ञांचा सल्ला | पुढारी

पुणे : उपवास करा, पण आरोग्यदायी! आहार तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘श्रावण महिना हा पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपवासांची रेलचेल असलेला महिना! उपवास असल्याने हा महिना आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायक मानला जातो. मात्र, ‘उपाशी आणि दुप्पट खाशी’ अशी गत न होता उपवास शिस्तशीर पध्दतीने व आरोग्यदायी दृष्टीने अंमलात आणला जावा,’ असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार अशा विविध दिवशी उपवास करणा-यांची संख्या मोठी आहे. काही जण संपूर्ण श्रावण महिना केवळ एक वेळ जेवून उपवास करतात.

मात्र, उपवासाच्या दिवसांची संख्या जास्त असल्याने साबुदाणा, वेफर्स, उपवासाचा चिवडा असे पदार्थ सतत खाणे होते आणि ते आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यामुळे पित्त होणे, पोट दुखणे, अपचन अशा समस्या उदभवू शकतात. त्यामुळेच उपवासांच्या दिवशी फलाहार घेणे, द्रव पदार्थांवर भर देणे आरोग्यदायी ठरू शकते, असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

म्हणून उपवास ठरतो उपयुक्त
उपवास केल्याने शरीराला आणि पर्यायाने पचनक्रियेला काहीशी विश्रांती मिळते. त्यामुळे पोटाशी आणि त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात. वजन कमी करण्यासाठी उपवास करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, उपवासाच्या दिवशी पदार्थांची निवड आणि प्रमाण योग्य ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.

या दिवशी काय टाळावे?
रिकाम्या पोटी चहा, कॉफी अशा द्रवपदार्थांचे वारंवार सेवन टाळावे.
साबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने पित्त होणे, पोट दुखणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो साबुदाणा टाळावा.
तेलकट चिवडा, वेफर्स असे पदार्थ टाळावेत.

उपवासाच्या दिवशी काय खावे?
एकाच वेळी खूप फराळ न करता दोन-तीनदा थोडे खावे.
फलाहारावर जास्त भर द्यावा. सुका मेवा, दूध यावर भर

Back to top button