भीमाशंकर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुविधेसाठी मुखदर्शन | पुढारी

भीमाशंकर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांच्या सुविधेसाठी मुखदर्शन

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा; श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बारा ज्योर्तिलींगापैकी सहावे ज्योर्तिलींग म्हणून ओळखले जाते. अनादी काळापासून येथे श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. सोमवारी पहाटे 5 वा विधीवत पुजा करुन मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. कोरना महामारीनंतर यंदा मंगलमय वातावरणात यात्रा भरत आहे. त्यामुळे यंदा भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता गृहित धरुन पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानका पर्यंत एसटी महामंडळाच्या मोठ्या व मिनीबस ठेवण्यात आल्या आहे. मुख दर्शनबारीची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे. यात्रेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागिय अधिकारी सांरग कोडोलकर यांनी सांगितले आहे.

देवस्थानने यात्रेची जोरदार तयारी केली आहे. एसटीच्या जादा गाडया, आरोग्य सुविधा, दर्शनबारी, पाणी पुरवठा, विद्युत वितरणाची तयारी झाली आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात 228 पोलिस कर्मचारी, 80 होमगार्ड, 28 अधिकारी, जन्नर व खेड उपविभागिय पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. एसटी महामंडळाच्या मोठ्या जादा 9 बस, मिनीबस 19, पीएमपीएलच्या 10 बस ठेवण्यात आल्या आहे.

वन्यजीव विगागाचे 35 कर्मचारी हे टोलनाका ते मंदिर परिसरात कचरा व प्लास्टीक वापरास बंदी बाबत जनजागृती व जंगलातील घडामोडीवर लक्ष ठेवतील. आरोग्य विभागाने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याने वेगवेगळा बंदोबस्त नेमला आहे. बाँब्ब शोधक पथक, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, दर्शनबारीत यात्रेकरूंची तपासणी, वॉच टॉवर, डॉगस्कॉड, हँडमेटल डिटेक्टर अशी अत्याधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

Back to top button