पिंपरी : कोव्हिशिल्ड ‘लसी’ला आज ‘सुटी’ | पुढारी

पिंपरी : कोव्हिशिल्ड ‘लसी’ला आज ‘सुटी’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेण्यासाठी तुम्ही जर सोमवारी (दि. 1) महापालिकेच्या केंद्रांवर जाणार असाल तर थांबा. महापालिकेच्या आठ केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावर ही लस मिळणार नाही. कोव्हॅक्सिन लस आणि 12 ते 14 वयोगटातील मुलांसाठी कोर्बेव्हॅक्स ही लस मात्र दिली जाणार आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला कोव्हिशिल्ड लसीचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ही लस सोमवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नसल्याची माहिती महिला वैद्यकीय अधिकारी
डॉ. वर्षा डांगे यांनी दिली.

महापालिकेकडून सध्या 8 केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. 15 जुलैपासून प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स अशा तिन्ही लस मिळून 1500 लस देण्यात येत होत्या. मात्र, 26 जुलैपासून तिन्ही लस मिळून प्रत्येक केंद्रावर, एकूण फक्त 500 लसच देण्यात येऊ लागल्या आहेत. लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने केंद्रांवर लसही कमी प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. दरम्यान, सोमवारी प्रत्येक केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या 200 आणि कोर्बेव्हॅक्स 200 लस उपलब्ध असणार आहेत. सकाळी 9ः30 ते दुपारी 4ः30 या वेळेत लसीकरण करण्यात येईल.

Back to top button