नसरापूर : खुनाची धमकी देत चुलतीवर बलात्कार | पुढारी

नसरापूर : खुनाची धमकी देत चुलतीवर बलात्कार

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: चुलत पुतण्याने जिवे मारण्याची धमकी देत चुलतीवर बलात्कार केल्याची घटना राजगड पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या किकवी दूरक्षेत्राच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय पुतण्याने 27 वर्षीय चुलतीवर दि. 5 जुलैपासून दि. 21 जुलैदरम्यान, भाटघर धरणाला लागून असलेल्या गावच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पीडित महिला चुलती व चुलत पुतण्या बाजार करून दुचाकीवरून जात असताना तसेच पीडित महिला घरी एकटी असताना चुलत पुतण्याने पीडितेवर वेळोवेळी इच्छेविरुद्ध बलात्कार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने बलात्काराबाबत कोणाला काही सांगितल्यास, तुला व तुझे घरातील लोकांना जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. याबाबत पीडितेने फिर्याद दिली असून, तपास पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत जोशी करीत आहेत.

Back to top button