पिंपळे गुरव : बोगस मेसेजमुळे नागरिक हैराण | पुढारी

पिंपळे गुरव : बोगस मेसेजमुळे नागरिक हैराण

पिंपळे गुरव : मोबाईलवर महावितरण अधिकार्‍यांच्या नावाने वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित होईल, अशा आशयाचे मेसेज येत असल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. मागील वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, अशा प्रकारचे मेसेज मोबाईलवर मागील काही दिवसांपासून येत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच, या संदर्भातील माहिती घेण्यासाठी नागरिकांची महावितरणच्या कार्यालयामध्ये गर्दी होवू लागली आहे.

मागील काही दिवसांपासून पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांचा मोबाईलवर वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, असे मेसेज येत आहेत. त्यामुळे सायबर सेलकडून या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज आहे. नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
– शंतनु डोळस, स्थानिक नागरिक

 

ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जात आहे. ग्राहकांनी त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी या बनावट मेसेज व लिंककडे संपूर्णपणे दुर्लक्ष करावे.
                                           – रत्नदीप काळे, अभियंता, महावितरण सांगवी विभाग

Back to top button