पंढरीनाथनगर येथील कचर्‍याची साफसफाई | पुढारी

पंढरीनाथनगर येथील कचर्‍याची साफसफाई

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पंढरीनाथनगर येथील नागरिक घंटागाडी येत नसल्याने कचरा रस्त्याच्या कडेला टाकत होते. त्यामुळे कचर्‍याच्या समस्यांबाबत शुक्रवारी (दि. 29) दै. ‘पुढारी‘त वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत हा कचरा ग्रामपंचायतीने तातडीने हटविला.

येथील पंढरीनाथ नगरातील कचरा समस्या गंभीर झाली होती. ग्रामपंचायतीद्वारे येणारी घंटागाडी आलीच तर आठवड्यातून एक दिवस येत होती. त्यामुळे याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच काही क्षणातच कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे कर्मचारी तेथे पोहोचले. तेथील कचर्‍याची साफसफाई ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने त्वरित करण्यात आली. येथील ग्रामस्थांनी याबाबत दै. ‘पुढारी‘ व कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले.

Back to top button