पुणे : पीएमपीकडून शहरातील बसच्या मार्गांत बदल
पुणे; पुढारी वृत्तसेवा: बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमपीच्या या मार्गावर संचलनात असणार्या बस वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. बाजीराव रस्तामार्गे संचलनात असणारा मार्ग क्र. 2 स्वारगेट ते शिवाजीनगर (पुण्यदशम बससेवा) वगळून सोबतच्या तक्ता क्रमांक 1 मध्ये नमूद केलेले मार्ग जाताना दांडेकर पूल, शास्त्री रोड, फर्ग्युसन रोड व येताना जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्ता मार्गे स्वारगेटला येतील. तसेच तक्ता क्रमांक 2 मध्ये नमूद केलेले बसमार्ग जाताना टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता व येताना जंगली महाराज रस्त्याने डेक्कन- टिळक रस्ता मार्गे संचलनात राहणार आहेत. गुरुवारपासून (दि. 28) हा बदल लागू होईल, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
तक्ता क्रमांक – 1
अ.क्र. मार्ग क्र. मार्ग पासून पर्यंत
1. 2 अ कात्रज ते शिवाजीनगर
2. 11 मार्केटयार्ड ते पिंपळे गुरव
3. 11 अ मार्केटयार्ड ते कासारवाडी रेल्वे स्टेशन
4. 11 क कात्रज ते पिंपळे गुरव
5. 21 स्वारगेट ते सांगवी
6. 30 मार्केटयार्ड ते घोटावडे फाटा
7. 298 कात्रज गुजरवाडी ते चिंचवड गाव
तक्ता क्रमांक 2
अ.क्र. मार्ग क्र. मार्ग पासून पर्यंत
1. 20 सहकारनगर ते संगमवाडी
2. 37 सहकारनगर ते न.ता.वाडी
3. 68 अप्पर डेपो ते सुतारदरा