जि.प.तर्फे कर्मचार्‍यांचा सन्मान; तेरा गावांना ‘तालुका स्मार्ट ग्राम’ पुरस्कार | पुढारी

जि.प.तर्फे कर्मचार्‍यांचा सन्मान; तेरा गावांना ‘तालुका स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणार्‍या गुणवंत कर्मचारी पुरस्काराची घोषणा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. जिल्हा आणि पंचायतस्तरावर कार्यरत असणार्‍या वर्ग 3 आणि 4 संवर्गातील कर्मचार्‍यांसाठी हे पुरस्कार आहेत. त्याप्रमाणे स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत पुरस्कारप्राप्त ‘तालुका स्मार्ट ग्राम’ म्हणून गावांची निवडही जाहीर करण्यात आली.

गुणवंत कर्मचार्‍यांमध्ये जिल्हास्तरावर सहायक प्रशासन अधिकारी शेखर गायकवाड, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शीतल कोठावदे, सहायक लेखाधिकारी देवानंद पठाडे, कनिष्ठ लेखाधिकारी सतीश रानवडे, वरिष्ठ सहायक लिपिक शोभा सुबळकर व रमेश कदम, वरिष्ठ सहायक लेखा जितेंद्र चासकर, कनिष्ठ सहायक लिपिक दिनेश कर्वे, विस्ताराधिकारी नितीन पवार, मुकुंद देडगे, वाहनचालक प्रकाश सणस, वर्णोपचारक स्वप्निल हुजरे आणि परिचर शिल्पा कालेकर व रमेश गरुड.

पंचायत समितीस्तरावर कनिष्ठ प्रशासन अधिकारी अविनाश तिखे, वरिष्ठ सहायक लिपिक माणिक काटे, त्याचबरोबर कनिष्ठ सहायक लिपिक हा पुरस्कार विभागून देण्यात आला असून, त्यामध्ये सुशांत मोहिते, रमेश भोगावडे यांचा समावेश आहे. विस्तार अधिकारी अनिता ससाणे, विस्ताराधिकारी शिक्षण जीवन कोकणे, वाहनचालक आकाश कांबळे आणि परिचरमध्ये दीपक भोसले, शोभा बधे या दोघांना हा पुरस्कार विभागून मिळाला आहे.

‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती
आंबेगाव – फदालेवाडी/उगलेवाडी, बारामती – ढाकाळे, भोर – इंगवली, दौंड – मिरवडी, हवेली – सोरतापवाडी, इंदापूर – चाकाटी, जुन्नर – रानमळा, खेड – सावरदरी, मावळ – जांभूळ, मुळशी – ताम्हिणी, पुरंदर – गुर्‍होळी, शिरूर – कोंढापुरी, वेल्हे – वाजेघर बुद्रुक.

 

Back to top button