पुणे : ‘भक्तीचा कळस म्हणजे संत तुकाराम’ | पुढारी

पुणे : ‘भक्तीचा कळस म्हणजे संत तुकाराम’

पुणे : उत्तम कीर्तनकार, उत्तम कवी, उत्तम भक्त आणि उत्तम वारकरी या सर्वांचा आदर्श म्हणजे संत तुकोबा. ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा ते कळस आहेत,’ असे मत ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी व्यक्त केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘परिपूर्णता म्हणजे कळस. कळस बसणे हे परिपूर्णतेचे दर्शन म्हणून तुकोबाराय हे अलौकिक संत होते,’ असेही त्यांनी सांगितले.
बाबा महाराज सातारकर यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे निवडक अभंग याविषयावर निरुपण केले. बाबा महाराज सातारकर म्हणाले, की संत नामदेवरायांमध्ये भक्तीचे प्राधान्य आहे, तर ज्ञान मागे आहे. संत तुकाराम महाराजांच्या अवतारात सर्व काही जन्मजात आहे, ज्ञानही आहे आणि भक्तीही आहे.

Back to top button