पुणे : मोफा प्रकरणात डीएसकेंना जामीन | पुढारी

पुणे : मोफा प्रकरणात डीएसकेंना जामीन

पुणे : सदनिकेसाठी आगाऊ रक्कम घेऊनही सदनिकेचा ताबा दिला नाही म्हणून दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना सत्र न्यायाधीश एस. के. डुगावकर यांनी जामीन मंजूर केला आहे. याबाबत सिंहगड पोलिस ठाण्यात मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी सदनिका खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि सदनिकेचा ताबा देण्यात अयशस्वी ठरल्याचा आरोप फिर्यादित करण्यात आला. या गुन्ह्याच्या संदर्भात डीएसके यांना 5 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या मुख्य गुन्ह्यात डीएसके आणि इतर आरोपी 17 फेब्रुवारी 2018 पासून तुरुंगात आहेत.

Back to top button