धनकवडी : कौतुकास्पद! रिक्षाचालकाची मुलगी झाली सीए | पुढारी

धनकवडी : कौतुकास्पद! रिक्षाचालकाची मुलगी झाली सीए

धनकवडी, पुढारी वृत्तसेवा: खंबीर आर्थिक पाठबळ नसतानाही अथक परिश्रम आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर धनकवडीतील एका रिक्षाचालकाच्या मुलीने सीए होण्याचे स्वप्न साकार केले. प्रियांका चंदनशीव असे या मुलीचे नाव असून, सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रियांका ही मूळची भोर तालुक्यातील किवत गावातील गुलाब चंदनशिव यांची कनिष्ठ कन्या. एक मुलगा आणि दोन मुलींमध्ये प्रियांका ही धाकटी रिक्षा चालवून कुटुंबाचे अर्थार्जन करणार्‍या कुटुंबातील प्रियांका हिचे प्राथमिक शिक्षण धनकवडीतील एका मराठी माध्यमाच्या शाळेत झाले.

पुढील उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथे झाले. स्वत: सुशिक्षित असलेल्या गुलाब चंदनशिव यांनी आपल्या नाजूक परिस्थितीची सबब न सांगता परिवाराच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असणार्‍या प्रियांकाला सीए होण्याची मनापासून इच्छा होती आणि तेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रोज आठ ते दहा तास अभ्यासाचे योग्य नियोजन केले. त्यामुळेच हे यश मिळाल्याचे प्रियांकाने या वेळी बोलताना सांगितले.

Back to top button