सिंधुदुर्ग : केदारनाथ येथे दरड कोसळून भांडेगाव येथील भाविकाचा मृत्यू | पुढारी

सिंधुदुर्ग : केदारनाथ येथे दरड कोसळून भांडेगाव येथील भाविकाचा मृत्यू

सुलतानपूर, पुढारी वृत्तसेवा : केदारनाथ मंदिरापासून चालत जात असताना अचानक दरड कोसळून भाविकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि २१) रात्री आठच्या सुमारास घडली. रावसाहेब विठठल चव्हाण ( वय ५२ वर्षे ) असे या भाविकाचे नाव आहे. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली आहे.

भांडेगाव येथील रावसाहेब विठल चव्हाण, हे पत्नी अंतिकाबाई चव्हाण, नात हर्षदा भानुदास चव्हाण, बहीण सोमित्रबई बाजीराव सोनवणे , गावातील अनुसायाबई खंडेराव चव्हान यांच्यासोबत ३ मे रोजी भांडेगाव येथून केदारनाथ यात्रेसाठी निघाले होते. केदारनाथ मंदिरापासून पाच किलो मीटर पाठीमागे रस्त्यात पायी चालताना अचानक दरड कोसळली. त्यातील एक मोठा दगड रावसाहेब चव्हाण यांच्या डोक्यात पडला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या भांडे गावातील अनुसयाबाई खंडेराव चव्हाण यांच्याही अंगावर दगड पडल्याने ही महिला किरकोळ जखमी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रावसाहेब चव्हाण यांना प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. येथेच त्याच्या मृतदेहावर शवविचेदन करून त्यांच्या मृतदेह भांडेगाव येथे पाठवण्यात आला. जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर चव्हाण यांचे ते वडील होते.

हेही वाचा :

Back to top button