अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका | पुढारी

अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपळे गुरवच्या अंतर्गत आणि मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. अर्धवट कामांमुळे अपघाताचा धोका व्यक्त केला जात आहे. परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

ड्रेनेज, पिण्याची पाइपलाइन, रस्त्यांचे क्रॉकिटीकरण आदी कामे सुरू आहेत. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, अनेक कामे अर्धवट राहिल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा  लागत आहे. मागील आठ दिवसांपासून परिसरात मुसळधार पावसामने हजेरी लावली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पितळ उघडे पडले. पिंपळे गुरवच्या अंतर्गत आणि मुख्य वाहतुकीचे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.

पिंपळे गुरव येथील तुळजाभवानीनगरकडे जाणार्‍या रस्तातील मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका व्यक्त केला जात आहे. पावसाळा पूर्वी अर्धवट कामे पूर्ण न केल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे हा परिसर अपघाताचा स्पॉट बनला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी लवकरात सर्व अर्धवट कामे पूर्ण करण्याची आणि रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी केली आहे.

Back to top button