पुणे : मोरगाव कर्‍हा बंधारा कोरडाच | पुढारी

पुणे : मोरगाव कर्‍हा बंधारा कोरडाच

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्याचा पश्चिम जिरायती भागात यंदा पावसाचे प्रमाण नगण्य आहे. मोरगाव परिसरात सुमारे एक ते तीन मिलीमीटर पाऊस रिमझिम पध्दतीने झाला आहे. दिवसभर आकाश ढगाळलेले असते, मात्र पाऊस नाही असे चित्र असून मोरगाव येथील कर्‍हा नदीवरील बंधारा एैन पावसाळ्यातही कोरडा ठणठणीत आहे.

महाराष्ट्र शासनाने बर्‍याच वर्षांपूर्वी ओढा खोलीकरणातून जलसंपदा विभागाने या बंधार्‍याचे काम केले होते. मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत बंधारा भरलेला होता. तदनंतर अद्याप या बंधार्‍यात पाण्याचा टिपूसही पाहावयास मिळत नाही. कर्‍हा नदीच्या तीरावर तीर्थक्षेत्र गणेश कुंड, मोरया गोसावी यांचे जन्म ठिकाण. पवळी नदीच्या काठावर शिवमंदिरे पाहावयास मिळतात.

कर्‍हा नदीकाठावरील पुरातन शिवमंदिर मन वेधून घेणारे आहे. गणेश कुंडामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक विधी वारंवार होत असतात, यासाठी गणेशकुंडानजीक टँकरच्या पाण्याची सुविधा करावी लागते. बंधार्‍यात जानाई-शिरसाईचे पाणी सोडल्यास गणेशभक्तांना कुंडावर होणार्‍या धार्मिक विधीला पाण्याचा उपयोग होऊ शकेल, अशी मागणी होत आहे.

Back to top button