‘अतिवृष्टीमुळे प्रवाशांनी घरातून लवकर निघावे’ | पुढारी

‘अतिवृष्टीमुळे प्रवाशांनी घरातून लवकर निघावे’

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हवामान खात्याने पुणे आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे विमान प्रवाशांनी विमानोड्डाण वेळेच्या किमान दोन ते अडीच तास अगोदरच विमानतळ टर्मिनल येथे हजर व्हावे, असे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.
गेले काही दिवस जोरदार पाऊस होत आहे. त्यातच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. विमानतळावर येताना ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर होत आहे. परिणामी, विमानांची उड्डाणेदेखील उशिराने होत आहेत. हे लक्षात घेऊन प्रवाशांनी ही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button