मंडपासाठी ठेवावेत गतवर्षीचेच परवाने; गणेश मंडळांची पालिकेकडे मागणी | पुढारी

मंडपासाठी ठेवावेत गतवर्षीचेच परवाने; गणेश मंडळांची पालिकेकडे मागणी

पुणे; सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी घ्यावी लागणारी महापालिकेची परवानगी गतवर्षीचीच ग्राह्य धरावी, अशी मागणी शहरातील गणेश मंडळांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभा करण्यासाठी दरवर्षी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते.

परवान्यांना वेळ लागत असल्याने कार्यकर्त्यांना तासंतास थांबावे लागते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षे प्रशासनाने नवीन परवाने न देता पूर्वीचेच परवाने ग्राह्य धरले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्याही गणेशोत्सवासाठी गतवर्षीचेच परवाने ग्राह्य धरण्याची मागणी गुरुवारी कार्यकर्त्यांनी आयुक्तांना केली.

Back to top button