टाकवे बुद्रुक : आंदर मावळात सरीवर सरी | पुढारी

टाकवे बुद्रुक : आंदर मावळात सरीवर सरी

टाकवे बुद्रुक : आंदर मावळ परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. संततधारेमुळे परिसरातील ओढे, नाले, धबधबे वाहू लागले असून भात खाचरेदेखील तुडुंब भरली आहेत. आंदर मावळ परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंगर हिरवाईने नटू लागले आहेत. आंदर मावळ परिसरातील गर्द झाडी, धबधबे याची सर्वांनाच भुरळ पडते.

या परिसरात ठोकळ वाडी धरण, आंद्रा धरण अशी दोन धरणे असून बाजूने डोंगर आहेत. डोंगराच्या कुशीत अनेक गावे वसली आहेत. वहानगाव येथिल प्रसिद्ध अंजनी माता मंदिर, कुसुर, खाडी ही गावे अठरा नंबर या नावाने ओळखले जातात. येथून कोकण पट्टीचे दर्शन होते. या परिसरात आले की निसर्गाच्या सानिध्यात येऊन पर्यटक मनसोक्त आनंद घेतो. पाऊस सुरू असल्याने शेतकर्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Back to top button