सिंहगडावर ई-बसची यशस्वी ट्रायल | पुढारी

सिंहगडावर ई-बसची यशस्वी ट्रायल

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या घाटरस्त्यावरील धोकादायक वळणे व अरुंद ठिकाणी मंगळवारी पीएमपीएलने नव्याने घेतलेल्या सात मीटर लांबीच्या लहान आकाराच्या ई-बसची ट्रायल विनाअडथळा पार पडली. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली सिंहगडावरील पर्यावरणपूरक ई-बससेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान आकाराच्या ई-बसची ट्रायल फेरी आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धो-धो पावसात 11 किलोमीटर अंतराच्या घाटरस्त्यावर विनाअडथळा पार पडली.

ई-बसची पुन्हा ट्रायल घेऊन सिंहगड बससेवेचा लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी स्पष्ट केले. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने वन खात्याने पीएमपीएलच्या सहकार्याने ही ई-बससेवा सुरू केली. त्यामुळे सर्व खासगी वाहनांना गडावर मनाई करण्यात आली होती.

Back to top button