पुणे : पोलिसामुळे वाचला जखमी तरुणाचा जीव | पुढारी

पुणे : पोलिसामुळे वाचला जखमी तरुणाचा जीव

पुणे : नर्‍हे परिसरात राहणार्‍या रोहन प्रशांत डोईफोडे या तरुणाला जिवे मारण्याच्या हेतूने दगडाने मारहाण करण्यात आली. यात तो गंभीर झाला मात्र वेळीच घटनास्थळी पाहोचून पोलिसांनी त्या तरुणाला त्वरीत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
याप्रकरणी तरूणावर हल्ला करणार्‍या दोन अल्पवयीन मुलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले.

दि. 28 जून रोजी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व अमंलदार हे दैनदिन कामकाज करत असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन मुले भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आली. तेथे ते अमंलदार धनाजी धोत्रे यांना त्यांनी तुकारामनगर शिल्प सिध्द बिल्डींगच्यामागील मोकळ्या शेतामध्य एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये दगड घालुन त्यास जखमी केल्याचे सांगितलेे.

त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे निरीक्षक संगिता यादव घटनास्थळी गेले असता त्यांना एका व्यक्तीच्या डोक्यात दगडी घातलेली व तो जखमी अवस्थेत असल्याचे त्यांना दिसले. त्यांच्या कर्मचार्‍यांनी संबधीत व्यक्तीला शेतातून बाहेर बांधावर आणून औषधोपचारासाठी त्याला रूग्णालयात पाठवले. याबाबत उपनिरीक्षक नितीन शिंदे व धिरज गुप्ता यांना जखमीबाबत माहिती घेण्यास सांगितले.

Back to top button