बारामती-पंढरपूर सायकल वारीत 111 सायकलपटूंचा सहभाग | पुढारी

बारामती-पंढरपूर सायकल वारीत 111 सायकलपटूंचा सहभाग

बारामती : पुढारी वृत्तसेवा : आषाढी वारीनिमित्त आणि पर्यावरण संतुलन, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व समाजाला पटावे, यासाठी बारामती ते पंढरपूर, अशी सायकलवारीस मोठा प्रतिसाद लाभला. वारीत 111 जणांनी सहभाग घेतला. तर, राज्यभरातूनही तब्बल 1600 सायकलपटूंनी पंढरपूर गाठले.

बारामती सायकल क्लब, पंढरपूर सायकल क्लब, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्याद्वारे या रॅलीचे आयोजन केले होते. दि. 2 व 3 जुलै रोजी रॅली झाली. बारामती सायकल क्लबच्या 111 सदस्यांनी बारामती ते पंढरपूर हे 110 किलोमीटरचे अंतर सायकलद्वारे पार करत पंढरीत जात विठुरायाचे दर्शन घेतले.

दि. 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजता राज्यातील 46 ठिकाणांहून 1600 सायकलपटू पंढरपुरात पोहोचले. तनपुरे मठात रॅलीची समाप्ती झाली. गोल सायकल रिंगण व विठुनामाचा गजराने सांगता झाली.नाशिक, पंढरपूर, बारामतीच्या क्लबने आयोजन केले होते. उमेश परिचारिक, बारामतीचे अ‍ॅड. श्रीनिवास वायकर यांनी त्यात विशेष योगदान दिले. उपस्थित सर्व 1600 सायकलपटूंना प्रमाणपत्र दिले. त्यांची निवासाची व्यवस्था भक्तनिवासात केली. बारामतीतून यापुढील काळात अधिकाधिक सायकलपटू या रॅलीत सहभागी होणार असल्याचे अ‍ॅड. वायकर यांनी सांगितले.

Back to top button