पिंपरी : पंधरा शिल्पांसाठी पालिकेस 60 लाखांचा खर्च | पुढारी

पिंपरी : पंधरा शिल्पांसाठी पालिकेस 60 लाखांचा खर्च

पिंपरी : महापालिकेने टाकाऊ साहित्यातून सुंदर असा कलाकृती व शिल्प तयार केले आहेत. शहरातील विविध चौकांत ती 15 शिल्पे बसविण्यात आली आहेत. ती तयार करण्यासाठी महापालिकेने सुमारे 60 लाखांचा खर्च केला आहे. एका शिल्पास साधारण 4 लाखांचा खर्च झाला आहे.

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ठिकठिकाणी शिल्प उभारण्याचा निर्णय पालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागाने घेतला. त्यासाठी निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील मैला शुद्धीकरण केंद्र, कार्यशाळा, वल्लभनगरचे पादचारी पूल, भक्ती-शक्ती चौक आदी ठिकाणचे टाकाऊ साहित्य वापरण्यात आले.

देशातील प्रसिद्ध कलाकारांनी टाकाऊ व भंगार साहित्यातून आकर्षक व सुंदर अशी 15 शिल्पे दोन टप्प्यात तयार केली. आर्ट जेन यांनी सहा शिल्प तयार करण्यासाठी 19 लाख 47 हजार रुपये अधिक 18 टक्के जीएसटी असे शुल्क घेतले. सुनील श्रीधर यांनी सहा शिल्पांकरिता 16 लाख 50 हजार आणि चंदर प्रकाश यांनी तीन शिल्पासाठी 8 लाख 25 हजार इतके शुल्क घेतले. तसेच, कलाकारांचे निवास व जेवण व्यवस्थेवर 14 लाख 61 हजारांचा खर्च झाला आहे.

Back to top button