नगर-कल्याण महामार्गावर दुचाकीस्वार ठार | पुढारी

नगर-कल्याण महामार्गावर दुचाकीस्वार ठार

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा: नगर-कल्याण महामार्गावरील गुंजाळवाडी (ता. जुन्नर) शिवारात एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीचालकाचा जागेवरच मृत्यु झाला. ही घटना ३ जुलै ला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. बाळू धोंडिभाऊ हडवळे (वय ५0, रा. राजुरी , ता.जुन्नर ) असे अपघातात मृत्यु झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, राजुरी येथील बाळू हाडवळे दुचाकीने (एमएच 14 एफपी 7845) पेट्रोल टाकण्यासाठी बेल्हे येथे रविवारी दुपारी गेले होते.

तेथून नगर-कल्याण महामार्गाने राजुरी येथे परतताना गुंजाळवाडी शिवारात आले असता पाचच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते जागेवरच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पोलिस पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Back to top button