नारायणगाव-खोडद रस्त्याची अत्यंत दुरवस्था | पुढारी

नारायणगाव-खोडद रस्त्याची अत्यंत दुरवस्था

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव मुख्य चौक ते खोडद रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना आणून सर्व खड्डयांची पाहणी करून तातडीने खड्डे भरण्यास सांगितले. दोन दिवसांत हे काम केले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे, रोहन वाजगे, महेंद्र काळे, रामकृष्ण चोपडा, प्रदीप शेटे, चैतन्य काळे व कार्यकर्ते यांनी दिला आहे.

नारायणगाव मुख्य चौक ते खोडद रस्त्यावर अनेक खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोडद रोड येथील स्थानिक रहिवासी व व्यापारी यांनी अनेक वेळा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत होते. या रस्त्याने जाताना येथील सर्व रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक महिला, लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी याच रस्त्यावरून स्कूटीवर जात असतात अनेक अपघात येथे झाले आहेत,

ही परिस्थिती पाहून सूरज वाजगे व सर्व सहकार्‍यांनी सार्वजनिक बांधकाम नारायणगाव विभागाच्या कार्यालयात जाऊन उपअभियंता रायकर यांना खोडद रस्त्याची पाहणी करण्यासाठी तातडीने घेऊन आले. यावेळी रस्त्याची अवस्था पाहून रायकर यांनी येत्या दोन दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावतो, असे सांगितले, तर याबाबत जुन्नर तालुक्याचे आ. अतुल बेनके यांनी लवकरच हा संपूर्ण रस्ता नव्याने करण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत वर्क ऑर्डर येईल, असे आश्वासन

Back to top button