मेंढ्यांच्या रिंगणाने भाविकांमध्ये उत्साह | पुढारी

मेंढ्यांच्या रिंगणाने भाविकांमध्ये उत्साह

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा: माळेगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी (दि.1) संत सोपानकाका पालखीस भक्तिभावाने निरोप दिला. निरोपापूर्वी झालेल्या मेंढ्यांच्या रिंगणाने भाविकांमध्ये उत्साह निर्माण केला. दहा वर्षांनंतर मुक्कामी राहिलेल्या पालखीचे माळेगावात उत्साहात स्वागत झाले. मारुती मंदिरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवारी दुपारी पालखीस भक्तिभावाने निरोप देण्यात आला. निरोपावेळी म्हस्कू मोटे, आण्णा मोटे, हिरामण मोटे, गोपी मोटे, संदीप मोटे यांच्या चारशे मेंढ्यांचे गोल रिंगण चित्तवेधक ठरले.

निरोपावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, दीपक तावरे, अमित तावरे, धनवान वदक, वसंत तावरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ठिकठिकाणी वारकर्‍यांना अल्पोपाहार, चहावाटप करण्यात आले. एस. पी. सराफ प्रा.लि., स्व. शंकरतात्या गव्हाणे स्मृती प्रतिष्ठान, स्व. स्वरूपभय्या वाघमोडे, कै. वस्ताद चिमाजी गोंडे तालिम व दहीहंडी संघ, आनंदी फाउंडेशन, महावितरण माळेगाव शाखा, शरद पतसंस्था, राजहंस पतसंस्था, शंकर पतसंस्था, माळेगाव कारखाना, माळेगाव पतसंस्था, नवजीवन उद्योगसमूह, अनिल टी सेंटर, हॉटेल प्रशांत, हॉटेल सचिन, राधेश्याम बिल्डर्स यांनी सेवा दिली. नगरपंचायत कर्मचारी संघटनेने शंभर वारकर्‍यांना रेनकोट दिले.

Back to top button