पिंपरी : महावितरण कर्मचार्‍याला धक्काबुक्की | पुढारी

पिंपरी : महावितरण कर्मचार्‍याला धक्काबुक्की

पिंपरी : विद्युत पुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्मचार्‍यास बीअर शॉपी मालकाने शिवीगाळ, धक्काबुक्की केली. या प्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मयूर चंद्रकांत चौधरी (22, रा. चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, काळुराम आनंदा जाधव (रा.चाकण) याच्यावर गुन्हा दाखल आहे.

सातार्‍याने दिला महाराष्ट्राला चौथा मुख्यमंत्री

आरोपी जाधवची चाकण येथे बिअर शॉपी आहे. आरोपीने डिसेंबर 2021 पासून वीजबिल भरले नसल्याने महावितरणने त्याला नोटीस दिली; मात्र तरीही बिल न भरल्याने महावितरण कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेले. त्यावेळी जाधव याने त्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. घटनेनंतर आरोपी जाधव फरार झाला आहे.

Back to top button