पुणे : वाल्हे पंचक्रोशीतील शेतकरीवर्ग चिंतेत | पुढारी

पुणे : वाल्हे पंचक्रोशीतील शेतकरीवर्ग चिंतेत

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : यंदा मृग नक्षत्र कोरडे गेले. हवामान खात्याचा अंदाजसुद्धा चुकला. पाऊस अद्यापही लपाछपीचा खेळ खेळत असल्याने पेरण्यांची शाश्वती राहिली नाही. परिणामी, वाल्हे पंचक्रोशीतील शेतकरी चिंतेत पडले आहेत.

MP Sanjay Raut : फडणवीसांनी डबक्यात उतरू नये; संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यांना सल्ला

जून संपत आला, तरी कधी कडाक्याचे ऊन, कधी काळ्याकुट्ट आभाळाची छाया, मध्येच दोन-चार मिनिटांच्या पावसाच्या सरी, असा लपाछपीचा खेळ वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात सुरू आहे. पाऊस नसल्याने पेरण्या खोळंबल्या असून, शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आधीच पेचात अडकले आहेत. पेरणी केली आणि पावसाने दडीच मारली, तर कसे होणार? महागडी बियाण्यांची ’रिस्क’ घेणार तरी कशी ? असा सवाल शेतकर्‍यांमध्ये विचारला जात आहे.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पिकांच्या खुरपण्या सुरू व्हायला पाहिजे होत्या, मात्र मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने दडी मारल्याने, अद्याप पेरण्याच झालेल्या नाहीत. पाऊस उशिरा पडल्याने पेरण्याही लांबून उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पेरणी लांबल्याने शेतकर्‍यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे. पेरणीयोग्य पाऊस केव्हा होईल, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वमशागतीची कामे आवरून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, लांबणीवर गेलेल्या पावसाचा फटका शेतकरी घेत असलेल्या पीककर्जावर पडणार आहे.

आदेश बांदेकर-शरद पोंक्षे यांच्यात सोशल मीडिया वॉर, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

थकबाकी पूर्ण केल्याशिवाय कर्ज नाही

समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकरी पीककर्ज काढत असतात. हंगामात शेतकर्‍यांची अडचण होऊ नये म्हणून पीककर्जाचे वाटप होते. तसेच, या कर्जाच्या व्याजदरात सूट मिळत असते. हे कर्ज शेतकर्‍यांना ऐन गरजेच्या वेळी कामी येते. मात्र, सध्याची प्रतिकूल परिस्थिती पाहता शेतकरी स्वतःहून पीककर्ज काढण्याकडे पाठ फिरवत आहेत. तसेच, मागील पीककर्जाची थकबाकी असणार्‍या शेतकर्‍यांना थकबाकी पूर्ण केल्याशिवाय नवीन कर्ज मिळत नाही.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

पीककर्ज उचलण्यात घट

केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीककर्जावर जिल्हा बँकांना प्राप्त होणारे 2 टक्के व्याज परतावा अनुदान हे आर्थिक वर्ष 2022 -23 या चालू वर्षापासून बंद केले आहे. अनुदान बंदचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. जिल्हा बँकांनादेखील तोटा सहन करावा लागणार आहे. तसेच, 2020 पूर्वी जिल्ह्यातील सर्व शेतकर्‍यांना व्याजाची रक्कम भरावी लागत नव्हती. मात्र, 2021 पासून, सर्व शेतकर्‍यांना 6 टक्के व्याजाची रक्कम भरावी लागत असून, ती रक्कम शासन कधी आपल्या खात्यावर जमा करेल? याची वाट पाहत बसावे लागत आहे. मागील वर्षी 2021 साली भरलेल्या व्याजाचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळाले नाहीत. परिणामी, 10 टक्के शेतकर्‍यांनी कर्ज घेण्यास टाळले आहे.

Back to top button