पावसामुळे रस्त्यावर राडारोडा गावागावांतील वाड्या-वस्त्यांवरील स्थिती | पुढारी

पावसामुळे रस्त्यावर राडारोडा गावागावांतील वाड्या-वस्त्यांवरील स्थिती

नानगाव : पुढारी वृत्तसेवा: गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. यामुळे दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावातील वाड्या-वस्त्यांपर्यंत जाणार्‍या रस्त्यांवर पाणी साठत चिखल झाला असून, रस्त्यावर सध्या राडारोडा पाहावयास मिळत आहे. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात या भागात पावसाने आगमन केले होते. मात्र, दोन दिवस पडणार्‍या पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली होती. त्यामुळे या महिन्यात पाऊस पडणार का? अशी शंका शेतकरी उपस्थित करीत होते. मात्र, शनिवारी (दि. 25) पावसाला पुन्हा सुरुवात झाली.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वरवंड येथे पावसात आगमन झाले, तर रविवारी (दि. 26) देखील पालखी सोहळ्यावर वरुणराजाने बरसात केली. त्यामुळे विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दौंड तालुक्यात आगमन केल्याने शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, भीमा नदीकाठच्या गावात पावसाने हजेरी दिल्याने या भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठत असून, रस्त्यावर चिखलाचा राडारोडा होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व शाळेत जाणारे विद्यार्थी यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवात झालेल्या पावसामुळे पुढील काळात हे रस्ते चिखलमय होणार आहेत.

हेही वाचा

ग्रीन टी किती वेळा प्यावा?

नाशिक : महापालिकेची नोकरभरती बंडाच्या कात्रीत, भरतीची आशा तूर्त मावळली

पोलिस भरती प्रक्रियेत मोठा बदल; शारीरिक चाचणीनंतर होणार लेखी परीक्षा

 

Back to top button