ग्रीन टी किती वेळा प्यावा? | पुढारी

ग्रीन टी किती वेळा प्यावा?

नवी दिल्‍ली : काही खाद्यपदार्थ किंवा पेयं ही आरोग्यासाठी चांगली असतात. मात्र, त्यांचे किती प्रमाणात सेवन करावे याबाबतही काही मर्यादा असतातच. ग्रीन टीचेही तसेच आहे. ग्रीन टी पिल्याने वजन कमी होण्याबरोबरच अन्यही अनेक लाभ मिळतात. त्यामधील अँटिऑक्सिडंटस् कर्करोगासारखे आजार दूर ठेवण्यास मदत करतात. मात्र, असा ग्रीन टी दिवसातून किती प्रमाणात घ्यावा, अधिक पिण्याचे दुष्परिणाम कोणते हे सुद्धा समजून घेणे गरजेचे ठरते.

तज्ज्ञांच्या मते, एखादी व्यक्‍ती दिवसातून तीन ते पाच कप ग्रीन टी पिऊ शकते. मात्र, एखाद्या व्यक्‍तीला मधुमेह, कर्करोग किंवा हृदयविकार असेल तर याबाबत डॉक्टरांचा सल्‍ला घेऊनच ग्रीन टीचे सेवन करणे हितावह ठरते. ग्रीन टी घेण्याबाबत प्रत्येक व्यक्‍तीच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी आपल्या शरीराचा विचार करून आपण दररोज ग्रीन टीचे प्रमाण ठरवावे.

अधिक प्रमाणात ग्रीन टी पिल्याने काही दुष्परिणाम समोर येतात. शरीरात कॅफिनचे प्रमाण जास्त झाल्याने चिंता व नैराश्य दिसून येते. शरीरातून लोहाचे शोषण कमी होऊ शकते. गर्भवती महिलांनी याचे सेवन करणे टाळावे किंवा जास्त सेवन करू नये.

Back to top button