आषाढी सोहळ्यासाठी सर्वत्र तयारी | पुढारी

आषाढी सोहळ्यासाठी सर्वत्र तयारी

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा: यंदा मोठ्या थाटामाटात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा साजरा होणार आहे. त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर पायी पंढरपूर वारी व डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी सोहळा यंदा भाविक तसेच नागरिकांना पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने पालखी मार्गावरील विविध लहान-मोठे व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सुरू होतील.

कोरोना व लॉकडाऊनमुळे दोन वर्षे पायी (वारी) पालखी सोहळा झाला नाही. वारकऱ्यांची गर्दी, पायी वारी दोन वर्षे दिसून आली नाही. पालखी मार्गावरील व्यवसाय यामुळे पूर्णपणे ठप्प झाले होते. सर्व मंदिरांना टाळे ठोकण्यात आले होते. त्यामुळे गावागावातील आर्थिक उलाढालीवर गंभीर परिणाम झाला होता. या काळात अनेकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागले.

आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू ते पंढरपूर पायी वारी ही अनेक वर्षांची परंपरा आहे. गावागावातील दिंड्या व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. भक्तिमय वातावरणात श्रद्धेने लाखो भाविक व वारकरी 17 ते 18 दिवस पायी वारी करून पंढरपूरला दाखल होतात. रविवारी (दि. 10 जुलै) आषाढी एकादशी आहे.

यवतमाळ : पोलिस अधीक्षकांच्या नावे चिट्ठी लिहून जमादाराची आत्महत्या

सोमवारी (दि. 20 जून) श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. वारीच्या स्वागताची गावागावात जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त हॉटेल, पूजेच्या साहित्याची व इतर दुकानांची उलाढाल वाढण्याची शक्यता आहे.

दौंड तालुक्यात तयारीला वेग
दौंड तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दरवर्षी जंगी स्वागत करण्यात येते. या ठिकाणी पालखी मुक्काम व विसावा घेते. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. विविध संस्था, संघटनांकडून वारकऱ्यांची सेवा केली जाते. वरवंड, चौफुला, पाटसमार्गे रोटी घाटातून पालखी बारामती तालुक्याकडे प्रस्थान करते. यानिमित्ताने दौंड तालुक्यात भक्तिमय वातावरण असते.

हेही वाचा

पुरंदरला आरोग्य यंत्रणा सज्ज; झेंडेवाडी ते निरा असणार आरोग्य विभागाची सेवा पथके

सातारा : वारकऱ्यांच्या वाहनाला आयशर टेंम्पोची धडक; एका वारकर्‍याचा मृत्‍यू , ३० जखमी

पुणे : वाढदिवसाला कोयते नाचवत दगडफेक उत्तमनगर परिसरात टोळक्याचा राडा

Back to top button