

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भररस्त्यात टोळक्याकडून वाढदिवस साजरा करण्यात येत होता. किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाल्याने टोळक्याने कोयते नाचवत परिसरातील दुचाकी आणि मोटारींची तोडफोड केली तसेच नागरिकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी सचिन दिलीप राठोड (वय 24, रा. कोंढवे धावडे) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार शुभम संदीप ठाकूर (वय 18), सोन्या खाडे, अक्षय राठोड तसेच अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रोहिम गणेश मौर्य (वय 20, रा. मोरे बिल्डिंग, कोपरे गाव) याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी शुभम ठाकूर याचा कोंढवे धावडे परिसरातील शिवशक्ती चौकात वाढदिवस साजरा करण्यात येत होता. आरोपींचा रोहिम मौर्य याच्याशी वाद झाला होता. ठाकूरचा वाढदिवस सुरू असताना टोळक्याने कोयते नाचवून दहशत माजविण्यास सुरुवात केली.
तडीपार गुंडाला पिस्तुलासह पकडले