सातारा : वारकऱ्यांच्या वाहनाला आयशर टेंम्पोची धडक; एका वारकर्‍याचा मृत्‍यू , ३० जखमी | पुढारी

सातारा : वारकऱ्यांच्या वाहनाला आयशर टेंम्पोची धडक; एका वारकर्‍याचा मृत्‍यू , ३० जखमी

शिरवळ : पुढारी वृत्तसेवा शिरवळ ( ता.खंडाळा ) येथे आज (रविवार) पहाटे सातारा ते पुणे दिशेने महामार्गावरील उड्डाणपुलावर कोल्हापूर ते आळंदी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला आयशर टेम्पोने (गाडी क्रमांक क्र.एम.एच.४५. ए.एफ.२२७७ ) जोरदार धडक दिली. या अपघातात एका वारकर्‍याचा मृत्यू झाला.  तीस वारकरी जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळलेली अधिक माहिती अशी की, भादोले ( ता. हातकंणगले, जि. कोल्हापूर ) येथील वारकरी आळंदीला निघाले होते. शिरवळ येथे आल्यानंतर पहाटे वारकर्‍यांच्या ट्रॉलीला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात मायाप्पा कोंडीबा माने यांचा दुर्देवी मृत्यू झाला. यामध्ये ३० वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचलंत का? 

Back to top button