जिल्ह्यात पाच दिवस मुसळधारेचा इशारा | पुढारी

जिल्ह्यात पाच दिवस मुसळधारेचा इशारा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या सात दिवसांपासून शहरात पावसाने दडी मारल्याने प्रचंड ऊन आणि उकाड्याने सर्वजण हैराण झाले होते. मात्र, शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात हवेचे दाब कमी झाल्याने मान्सून बरसण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे उद्या 19 पासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असून, 20 ते 24 जून या कालावधीत मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

यंदा 1 मार्च ते 10 जून असा 90 दिवस शहरात पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. जून उजाडताच राज्यातील काही भागांत पाऊस पडत असताना पुणे शहर व जिल्ह्यातही कमी पाऊस पडला. हवेचे दाब पुणे विभागातच जास्त असल्याने यंदा जिल्ह्यात मान्सूनचे आगमन 8 जूनला होऊनही तो गेल्या दहा दिवसांत फक्त एकच दिवस बरसला. त्यामुळे 18 दिवसांत फक्त 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

हवेचे दाब झाले कमी…

पुणे वेधशाळेने शुक्रवारी शहरातील हवेचे दाब कमी झाल्याचे जाहीर केले अन् वातावरणात गारवा पसरला. गेले काही दिवस शहरात हवेचे दाब 1006 हेक्टा पास्कल इतके होते. शुक्रवारी दि. 18 रोजी ते 1002 हेक्टा पास्कल इतके झाल्याने बाष्पयुक्त ढगांची गर्दी पुणे जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाली. तसेच घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. 20 ते 24 जून या पाच दिवसांत पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने ’यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा संपली असून, शहर परिसर आणि संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा

महाविकास आघाडीला विधानपरिषदेत निसंशय यश : धनंजय मुंडे

आजचे राशिभविष्य (दिनांक १९ जून)

Delhi Murder : जेवण दिले नाही म्हणून नवऱ्याने केला पत्नीचा खून; रात्रभर झोपला मृतदेहा शेजारी

Back to top button