महाविकास आघाडीला विधानपरिषदेत निसंशय यश : धनंजय मुंडे | पुढारी

महाविकास आघाडीला विधानपरिषदेत निसंशय यश : धनंजय मुंडे

बारामती, पुढारी वृत्तसेवा: राज्यसभेत ते झाले त्याची पुनरावृत्ती विधानपरिषदेत होणार नाही. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार खात्रीने विजयी होतील, असा विश्वास राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. ना. मुंडे म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीचे आणि आत्ताच्या विधानपरिषद निवडणुकीचे चित्र अगदी वेगळे आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यात तिळमात्र शंका नाही. मुंडे  १८ जून ला बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांची बैठक मुंबईत होत आहे. पुण्यातून मी मुंबईकडे बैठकीसाठी निघालो होतो. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खराब हवामानामुळे मुंबईतून बारामतीला येणे शक्य नसल्याने त्यांनी मला आदेश दिल्याने मी पुण्याहून बारामतीला आलो. येथून रात्रीत भरणे यांच्यासह मुंबईत पोहोचणार आहे.

हेही वाचा

Delhi Murder : जेवण दिले नाही म्हणून नवऱ्याने केला पत्नीचा खून; रात्रभर झोपला मृतदेहा शेजारी

PM Narendra Modi : तब्बल पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकला महाकाली मंदिरावर पताका

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांकडून दबाव : नाना पटोले

Back to top button