Delhi Murder : जेवण दिले नाही म्हणून नवऱ्याने केला पत्नीचा खून; रात्रभर झोपला मृतदेहा शेजारी | पुढारी

Delhi Murder : जेवण दिले नाही म्हणून नवऱ्याने केला पत्नीचा खून; रात्रभर झोपला मृतदेहा शेजारी

नवी दिल्ली : दिल्ली येथील एका व्यक्तीने जेवण वाढण्यास नकार दिल्याने दारुच्या नशेत त्याने आपल्या पत्नीचा खून (Delhi Murder) केला. दारुच्या नशेत तो रात्रभर पत्नीच्या मृतदेहा शेजारीच झोपला. सकाळी उठल्यानंतर त्याला आपण पत्नीचे खून केल्याचे कळाल्यावर त्याने ४० हजार घेऊन पळाला. ही घटना गुरुवार (दि. २३) रात्री घडली. घटनेची माहिती कळताच दिल्ली पोलिसांनी आरोपीला पैशासह ताब्यात घेतले. विनोद कुमार दुबे (वय ४७, रा. सुलतानपूर, दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी एका व्यक्तीचा पोलिसांना फोन आला. त्या व्यक्तीने सांगितले की, विनोद दुबे याने पत्नी सोनालीला (वय ३९) भांडण करत मारहाण केली. तसेच या भांडणात त्याने उशिच्या सहाय्याने तिचा खून (Delhi Murder) केला. घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीकडून व विनोद दुबेच्या इतर शेजाऱ्यांकडून अधिक माहिती घेतली. तसेच फरार असलेल्या विनोद दुबे याचा माग काढत त्याला ताब्यात घेतले.

विनोद दुबे याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्याकडून दोन दारुच्या बाटल्या, रक्ताने माखलेली खुशीसह तब्बल ४३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) पवन कुमार यांनी दिली.  (Delhi Murder)

यावेळी दुबे याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सांगितले की, गुरुवारी रात्री दोघांनी देखिल एकत्र बसून दारु प्याले. यानंतर विनोद याने पत्नीला जेवण आणण्यास सांगितले. सोनालीने त्यास नकार दिला. यावरुन दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी सोनालीने विनोदला थप्पड मारली. रागाच्या भरात विनोदने उशीच्या सहाय्याने सोनालीचा खून केला. नशेत त्याला आपण पत्नील मारल्याचे कळालेच नाही व तो रात्र भर पत्नीच्या मृतदेहा शेजारी झोपला. सकाळी उठल्यावर रात्री जे घडले हे समजल्यावर त्याने घरातील ४० हजार रुपये घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पण, अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला पकडले.

Back to top button