PM Narendra Modi : तब्बल पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकला महाकाली मंदिरावर पताका | पुढारी

PM Narendra Modi : तब्बल पाचशे वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकला महाकाली मंदिरावर पताका

अहमदाबाद; पुढारी ऑनलाईन : गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील प्रसिद्ध महाकाली मंदिरावर बनविण्यात आलेला दर्ग्याची देखभाल करणाऱ्याच्या सहमतीने स्थलांतर करण्यात आले. यानंतर शनिवारी (दि. १८) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंदिराच्या शिखरावर पतका फडकवला. तब्बल ५०० वर्षांनंतर या मंदिरावर हा पताका फडकावला गेला.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले (PM Narendra Modi), “महाकाली मंदिरावर फडकवण्यात आलेला पताका हा आध्यात्मिकतेचे प्रतिक आहे. शिवाय अनेक वर्षें उलटून गेल्यावर देखील आपली आस्था किती मजबूत आहे हे सिद्ध करते. या मंदिरावर मागील पाचशे वर्षांपूर्वी पासून ते स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे उलटून गेल्यानंतर पताका फडकला गेला नव्हता”.

पावागड डोंगरावर ११ व्या शतकात बनविण्यात आलेल्या मंदिराचे पुनर्विकास योजनेंतर्गत पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आले. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या महाकाली मंदिराचे उद्‍घाटन केले.

जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश

हे मंदिर चंपानेर – पावागड पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये केला आहे. दरवर्षी लाखो भाविक या मदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिराची देखभाल करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले की, महमूद बेगडा याने १५ शतकात जेव्हा चंपानेर वर आक्रमण केले होते तेव्हा हे मंदिराच्या शिखराला उद्‍ध्‍वस्‍त केले हाेते.

यानंतर या मदिरावर पीर सदनशाह यांचा दर्गा बनविण्यात आला. मंदिराच्या व्यवस्थापकांनी सांगितली की, पताका फडकविण्यासाठी खांब किंवा शिखराची आवश्कता असते. पण, मंदिराचे शिखर नव्हते यामुळे ५०० वर्षांपासून इथे पताकाच फडकवला गेला नाही. काही वर्षांपुर्वी जेव्हा पुनर्विकासाच्या कार्यास सुरुवात झाली. तेव्हा आम्ही दरर्ग्याची देखभाल करणाऱ्यांना विनंती केली या दर्ग्याचे स्थलांतर करु द्यावे, म्हणजे या मंदिराचे शिखर पुन्हा बनविता येईल. व्यवस्थापकांनी सांगितले की, विचारविनिमयाने दर्ग्याला मदिरापासून स्थलांतर करण्यासाठी वाटाघाटी झाल्या. सुत्रांच्या माहितीनुसार १२५ कोटी रुपये खर्चुन महकाली मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात येत आहे. ज्यामध्ये डोंगरावर असणाऱ्या मंदिरांच्या पायऱ्याचे रुंदीकरणासह आजूबाजूच्या परिसराचे डागडुजी करण्याचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button