आंदेकर टोळीतील फरारीला अटक | पुढारी

आंदेकर टोळीतील फरारीला अटक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास जबाबदार असल्याच्या कारणावरून ओंकार कुडले व त्याचा मित्र सूरज ठोंबरे या दोघांच्या खुनाचा प्रयत्न झाला. या गुन्ह्यात 15 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली. कुणाल सोमनाथ रावळ (वय 26) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

गुन्ह्यामध्ये सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर व त्याचे 14 साथीदार यांना अटक करून त्यांच्याविरोधात विशेष मोक्का न्यायालयात 21 जुलै 2021 रोजी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना कुणाल रावळ याला महेश जाधव आणि अक्षयकुमार वाबळे यांना मिळालेल्या माहितीवरून अटक करण्यात आली.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे यांच्या पथकाने केली. रावळ याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याला तडीपारही करण्यात आले होते. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत अशा स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता 17 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा

शहरातील विविध भागांत पाच घरफोड्या

चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

पिंपरी :टोळक्याकडून दोघांवर हल्ला, जुन्या भांडणाचा राग मनात धरून केला हल्ला

Back to top button