पुणे : पंढरपूरच्या युवकाचा अनैतिक संबंधांतून खून | पुढारी

पुणे : पंढरपूरच्या युवकाचा अनैतिक संबंधांतून खून

जंक्शन : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर तालुक्यातील युवकाचा अनैतिक संबंधांतून खून करून मृतदेह पुणे-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील कुरवली (ता. इंदापूर) येथील निरा नदीमध्ये टाकणार्‍यांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली. याबाबत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

विकास संभाजी पाखरे (वय 27, रा. बादलकोट, पो. करकंभ, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मृतदेह रविवारी (दि. 12) निरा नदीच्या पात्रात आढळला होता. पाखरे याचा अनैतिक संबंधांतून खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी नवनाथ श्रीधर नवले, सचिन श्रीधर नवले, महेंद्र आटोळे, दादा हगारे, साधना नवले (रा. बादलकोट, पो. करकंभ) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाखरे हा टेम्पो चालक होता. तो बारामती ते मंगळवेढा या रस्त्याने दररोज बारामतीहून पशुखाद्याची वाहतूक करीत होता. त्याचे गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय वरील आरोपींना होता. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी (दि. 10) रात्रीच्या वेळी पाखरे याचा खून करून हात-पाय दोरीच्या साहाय्याने सिमेंटच्या खांबाला बांधून मृतदेह कुरवली गावाजवळील निरा नदीत फेकून दिला. रविवार (दि.12) सकाळी पुणे व सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना निरा नदीमध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने तपासाची चक्रे फिरवत दोन दिवसांत पोलिसांनी खुनाचा छडा लावला.

कोरोना साथीची सर्वांत जास्त झळ वृद्धांना: ‘ब्रिज द गॅप : अंडरस्टँडिंग एल्डर नीड्स’ अहवालातील माहिती

वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, उपनिरीक्षक अतुल खंदारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, बाळासाहेब पानसरे, रवींद्र पाटमास, अजित थोरात, प्रमोद भोसले, अभिजित कळसकर, शैलेश स्वामी, मोनिका मोहिते यांनी या खुनाचा छडा लावला.

Back to top button