मावळातील शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज | पुढारी

मावळातील शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा : तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांची साफसफाई करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या स्वागताला शाळा सज्ज असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सात मुख्याध्यापक व पन्नास शिक्षक या कामकाजामध्ये सहभागी झाले होते.

कोल्हापूर : रंकाळा तलाव कोनशिलेवर पिचकारी; इतिहासप्रेमींकडून तीव्र शब्दांत निषेध

15 जूनपासून सर्व शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठीची आवश्यक सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेत सजावट करण्यात आली आहे. आतापर्यंत 125 विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला आहे. पालिकेच्या विविध शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग भरत असून विद्यार्थी संख्या मागील वर्षी पंधराशेच्या दरम्यान होती.

सध्या एकूण मंजूर शिक्षक 61 असून पालिकेकडे 50 शिक्षक आहेत. त्यामुळे शासनाकडून शिक्षक मिळावेत, अशी मागणी प्रशासनाने केली आहे.

Back to top button