मासेमारी करताना बोट उलटून एक जण बुडाला; पिंपळगाव जोगा धरणातील घटना | पुढारी

मासेमारी करताना बोट उलटून एक जण बुडाला; पिंपळगाव जोगा धरणातील घटना

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: अणे-माळशेज महामार्गालगत असलेल्या पिंपळगाव जोगा धरणात मासेमारी करायला गेलेले दोघे अचानक बोट उलटल्याने धरणात बुडाले. यातील एकाचा बुडून मृत्यू झाला, तर एक जण पोहून बाहेर आल्याने बचावला.

सुभाष बिश्वास व मिलान बिश्वास अशी या दोघांची नावे असून, हे दोन बुडाल्यानंतर त्यातील सुभाष बिश्वास हा पोहत बाहेर पडल्याची घटना घडली. ही घटना ९ जून सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, मिलान बिश्वास याचा मृतदेह तब्बल ३६ तासांनी ११ जून रोजी हाती आला आहे.

मदतकार्यात जुन्नर आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशांत कबाडी, रूपेश जगताप, राजकुमार चव्हाण, संकेत बोंबले, आदित्य आचार्य, अमोल जाधव, सुनील शिंदे, मनोहर केदार, संकेत कबाडी यांनी शर्तीचे प्रयत्न केले.याबाबत ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळपाडे तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

हेही वाचा 

कोल्हापूर : जवाहरच्या नामविस्तारास मंजूरी; कल्लापा आवाडे जवाहर साखर कारखाना असे होणार नामकरण

पुणे : नागपूरच्या सेवानिवृत्त शास्त्रज्ञाला १ कोटी १६ लाखाचा गंडा

हिंगोली : बासंबात भरधाव क्रुझर उलटली, तिघे गंभीर जखमी

Back to top button