Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, ५ मे २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, ५ मे २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊ रविवार (५ मे) तुमच्या राशीसाठी कसा जाईल

मेष : धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ घालवा

श्रीगणेश सांगतात की, आज सकारात्मकता कायम ठेवण्‍यासाठी धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ घालवा. तुम्ही घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. कोणतीही अशुभ सूचना मिळाल्यानेही मनात अशांतता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.

वृषभ :  विचारांची देवाणघेवाण होईल

सकारात्मक कृती करणाऱ्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण होईल. यामुळे तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. कोणत्‍याही विशेष प्रतिभेला चालना दिल्‍यास भविष्यात उत्पन्नाचे साधनही मिळू शकते. कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता असेल. चिंता करु नका लवकरच सर्व काही ठीक होईल. अनोळखी लोकांवर पटकन विश्‍वास ठेवू नका. खोट्या वादात पडू नका. व्यवसायाशी निगडीत कामात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल.

मिथुन : अनावश्यक खर्चात कपात करा

मालमत्तेसंबंधी कोणताही वाद मिटविला जाईल. अनावश्यक खर्चात कपात करा. अन्यथा आर्थिक तणाव निर्माण होईल. विद्यार्थी आणि तरुणांनी ताणतणावापासून लांब राहावे, अशी सूचना श्रीगणेश करतात. आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ द्या. घरातील वातावरण आनंददायी आणि शिस्तबद्ध ठेवा. आरोग्य चांगले राहिल.

कर्क : कोणीतरी तुमच्या भावनांचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकते

आज कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्‍यास तुमच्या जीवनशैलीत आणि दिनचर्येत सकारात्मक बदल घडवून येईरू. आळशीपणा टाळा. कोणीतरी तुमच्या भावनांचा आणि उदारतेचा फायदा घेऊ शकते. घर, गाडी आदींशी संबंधित कागदपत्रे गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्‍या. पोटविकास आणि ॲसिडीटीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

सिंह : अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढण्‍याची शक्‍यता 

श्रीगणेश सांगतात की, आज प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखाल. स्वतःला रचनात्मक कार्यात गुंतवून ठेवाल. जोखमीच्या कामात पैसे गुंतवण्याआधी संपूर्ण माहिती घेवूनच निर्णय घ्‍या. व्यवसायातील किचकट कामांबाबत पुन्हा विचार करावा लागेल. अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढण्‍याची शक्‍यता. आरोग्य चांगले राहिल.

कन्या : तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्यापासून दिलासा मिळेल

आज तुम्‍हाला सकारात्‍मक वाटेल. कुटुंबातील वडिलधाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन जीवनात अंगीकारणे फायदेशीर ठरेल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्यापासून दिलासा मिळेल. वास्‍तवाचा विचार करुनच कोणताही निर्णय घ्‍या. मानसिक शांतता अनुभवण्यासाठी ध्‍यानाची मदत घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतही कुटुंबासोबत वेळ घालवाल. वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होईल.

तूळ : रखडलेल्या कामांना आज गती मिळेल

रखडलेल्या कामांना आज गती मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. अनपेक्षित यशही मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. गरजू व्यक्तीला मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. पती-पत्नी एकमेकांशी योग्य सामंजस्य राखतील. पोटाशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात.

वृश्चिक : प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहिल.

श्रीगणेश म्‍हणतात की, दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास अधिक बळकट होईल. संपर्कक्षेत्र प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल. घरातील ज्येष्ठांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभेल. कामाचा अतिताण घेवू नका. काळ थोडा प्रतिकूल आहे. प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. आरोग्य चांगले राहील.

धनु : अतिकामाची जबाबदारी असेल;पण यशही मिळेल

आज आर्थिक बाबतीत तुम्ही योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अतिकामाची जबाबदारी असेल;पण यशही मिळेल. थोडेसे नकारात्मक कारवायात गुंतलेले लोक स्वार्थातून तुमच्याशी नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्‍या व्‍यस्‍ततेतून कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.

मकर : एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन अधिक प्रसन्न होईल

खूप दिवसांनी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन अधिक प्रसन्न होईल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या कामातही लक्ष देऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यातही तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. अतिआत्मविश्वास ठेवू नका. वेळेनुसार व्यवहारात लवचिकता आणणे आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित कामांना अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असेल. घरात आणि कुटुंबात तुमची उपस्थिती सर्वांना आनंद देऊ शकते. कोणताही जुना आजारामुळे पुन्हा त्रास होण्‍याची शक्‍यता आहे.

कुंभ : व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल

कोणतेही कौटुंबिक मतभेद चर्चा करून सोडवाल. तुमच्या कामांचे कौतुकही होईल आणि लोकप्रियतेचा आलेखही वाढेल. भावनिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत वाटेल. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमचे नियंत्रण ठेवा. सर्वकाही व्यवस्थित असतानाही, तुम्हाला विचित्र निराशेचा सामना करावा लागू शकतो. सकारात्मक लोकांसोबत चर्चा करा. व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल वाईट सवयी आणि वाईट संगत टाळा, अशी सूचना श्रीगणेश करतात.

मीन : तरुणांनाही त्यांच्या कामात यश मिळवण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीची मदत मिळू शकते.

आज अतिकामातूनही कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत वेळ व्‍यतित कराल, असे श्रीगणेश सांगतात. भावनेऐवजी बुद्धिमत्ता आणि चातुर्य वापरा. तरुणांनाही त्यांच्या कामात यश मिळवण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीची मदत मिळू शकते. मानसिक शांती मिळवण्यासाठी ध्यानाची मदत घ्‍या. घरातील मोठ्यांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. व्‍यवसायात परिस्‍थिती अनुकूल असेल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता.

 www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. 

Back to top button