नारायणगाव येथे राज्यातील पहिले बाल स्नेही पोलिस कक्ष | पुढारी

नारायणगाव येथे राज्यातील पहिले बाल स्नेही पोलिस कक्ष

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन व ज्ञानशक्ती विकास वाहिनी यांच्यामार्फत नारायणगाव पोलिस ठाणे येथे स्थापन करण्यात आलेल्या ”बाल स्नेही पोलिस कक्षा”चा उपयोग हा लहान मुले, मातांबरोबरच महिला पोलिसांना देखील होणार आहे. यामुळे बाल सरंक्षण कायद्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी होणार आहे. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचे पालन करून उभारलेले तालुक्यातील पाहिले बाल स्नेही पोलिस केंद्र असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.

बारामती: गहाणखताऐवजी केले जमिनीचे खरेदीखत; जमिनीवर पतसंस्थेकडून ३४ लाख रुपयांचे कर्ज

शनिवारी ११ जून रोजी नारायणगाव पोलिस ठाणे आवारात बालस्नेही पोलीस कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अमित बेनके, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक विकास जाधव, प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पृथ्वीराज ताटे, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ, ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या संचालिका गार्गी काळे आदींसह पोलीस कर्मचारी, वारुळवाडी, नारायणगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.

बारामती: शासकीय महिला रुग्णालयातील डाॅक्टर, कर्मचाऱ्यांना शिविगाळ, दमदाटी

गार्गी काळे यांनी प्रास्ताविकामध्ये बालस्नेही पोलीस कक्षाचा उद्देश हा लहान मुलांमध्ये पोलिसां बाबत असलेली भीती कमी होऊन त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण व्हावा हा असल्याचे सांगितले. नारायणगावप्रमाणे यवत व पुणे पोलिस आयुक्तालयात बालस्नेही पोलिस कक्ष उभारणीचे काम सुरू असून यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मोठे सहकार्य लाभले असल्याचे गार्गी काळे यांनी सांगितले सूत्रसंचालन अण्णासाहेब आवटे मंचर येथील प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी तर उपस्थितांचे आभार नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मानले.

Back to top button