75 कोटींच्या कर्जाचा बहाणा; १२ लाखांची फसवणुक | पुढारी

75 कोटींच्या कर्जाचा बहाणा; १२ लाखांची फसवणुक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या संचालकास शैक्षणिक कामकाजाकरिता 75 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, अशी बतावणी करून प्रोसेसिंग फी स्वरूपात 12 लाख घेऊन फसवणूक करण्यात आली.

देशातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात! २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण, ५४१ जणांचा मृत्यू

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश शेळके व मानसी शेळके (रा. कल्याण) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत जाधवर कॉलेजचे प्रमुख डॉ. सुधाकर उध्दवराव जाधवर (वय-60,रा. नर्‍हे) यांनी फिर्याद दिली आहे.

राज्यसभा निवडणूक : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या : संजय राऊत

राजेश शेळके व मानसी शेळके हे प्रोग्रेस एंटरप्रायझेसचे मालक आहे. त्यांनी डॉ. सुधाकर जाधवर यांचे प्रेरणा प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या सुधारणेसाठी 50 कोटी रुपये व उध्दवराव जाधवर फांऊडेशनला 25 कोटी रुपये, असे 75 कोटी रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यांनी जाधवर यांच्याकडून कर्जाच्या प्रोसेसिंग फी च्या नावाखाली आरटीजीएसने प्रोग्रेस एंटरप्रायझेसच्या व मानसी शेळके यांच्या बँक खात्यावर 12 लाख रुपये घेतले. मात्र, जाधवर यांना कर्ज न देता तसेच कर्ज मंजूर झाल्याची कागदपत्रे पाठवून फसवणूक केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

Back to top button