हडपसरमध्ये गुन्हेगाराचा खून; गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ठोकल्या बेड्या | पुढारी

हडपसरमध्ये गुन्हेगाराचा खून; गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खूनाचा गुन्हा दाखल असलेल्या मंगेश किशोर शिंगाडे (वय 26, रा. कुमार शिंगाडे कॉलनी, पापडेवस्ती, भेकराईनगर) या तरुणाचा खून करून कर्नाटक येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने १२ तासांच्या आत अटक केली. किरण विठ्ठल धोत्रे (वय.19), अजय सचिन माने (वय.20,राहणार दोघे भेकराईनगर), प्रशांत शंकर हिरेमठ (वय.19,रा. ढमाळवाडी हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी तिघांना हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गॅस दराचा पुन्‍हा उडणार भडका? : जूनच्या पहिल्‍याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडर दर वाढण्याची शक्‍यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंगाडे याच्याविरुद्ध 2016 मध्ये एक गुन्हा दाखल होता. सध्या तो कारागृहाबाहेर आला होता. तो सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास फुरसुुंगी येथील भेकराई बस डेपोशेजारील श्री मल्टी पर्पज हॉलच्या समोर आला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर लोखंडी कोयत्याने हल्ला केला. त्याच्या तोंडावर व डोक्यावर सपासप वार करुन त्याचा खून केला. रक्ताच्या थारोळयात मंगेश तेथे पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक दिंगंबर शिंदे, विश्वास डगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत राजू विष्णु शिंगाडे (वय 53, रा. पापडेवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे.

Avinash Bhosale : अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

कर्नाटकात जात होते पळून

शिंगाडे याच्या खूनाची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत पथकाला शिंगाडे याचा खून किरण, प्रशांत व अजय या तिघांनी केली असून, सध्या ते लोणी टोलनाका येथे थांबले आहेत, अशी माहिती मिळाली होती. तेथून ते प्रशांत याच्या कर्नाटकातील मुळ गावी जाणार असल्याचेहीपथकाला समजले. त्यानुसार पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, कर्मचारी अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले.

राज्‍यसभा निवडणुकीत भाजपला करायचा आहे घोडेबाजार : संजय राऊत

त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, दोन दिवसापुर्वी आरोपी व शिंगाडे याच्याद वाद झाले होते. त्यावेळी शिंगाडे याने आरोपींना शिवीगाळ केली होती. त्यातूनच तिघांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास शिंगाडे याला गाठून त्याच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये त्याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Back to top button