पुणे : नारायणगांव येथील हॉटेलमध्ये गोळीबार | पुढारी

पुणे : नारायणगांव येथील हॉटेलमध्ये गोळीबार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील बस स्थानकाशेजारी कपिल बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन गटात किरकोळ वादातून गोळीबार झाला. ही घटना मंगळवारी (दि. १०) रात्री ११ वाजता घडली. पोलिसांनी या घटनेतील तीन जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

sedition law : राजद्रोहाचं कलम १२४ अ तूर्तास स्थगित, सुप्रीम कोर्टाचा आदेश

मन्या पाटे, गणपत गाडेकर व त्यांचे इतर ४ ते ५ साथीदार तसेच आकाश उर्फ बाबू कोळी, त्याचा भाऊ व तीन अल्पवयीन आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबतची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यांनी दिली.

Taj Mahal Controversy : ताजमहाल आमचाच! जयपूर राजघराण्याने सांगितला हक्क

पोलिसांनी दिलेल्या व स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ बाबू कोळी, त्याचा भाऊ व साथीदार हे कपिल बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. त्यांनी खाण्यासाठी काहीतरी मागवले होते. दरम्यानच्या काळात मन्या पाटे व त्याच्या साथीदारांचा वेटर बरोबर बिलावरून काहीतरी वाद चालू होता. कोळी यांनी दिलेली ऑर्डर का लवकर येत नाही, यासाठी आकाश कोळी हा पाहण्यासाठी गेला असता त्याठिकाणी वेटर व मन्या पाटे यांच्यामधील वाद चालू असताना त्यांनी तुमची भांडण मिटवा व आम्हाला ऑर्डर आणून द्या, असे सांगितले. त्यावरून हा वाद विकोपाला गेला.

आता संभाजीराजेंच्या दौर्‍यावेळी होणार कुलाचार, पूजाविधी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा निर्णय

त्यामध्येच मन्या पाटे, गणपत गाडेकर व इतर ४ ते ५ साथिदार यांनी बेकायदेशीर जमाव जमवून दहशत माजवून, धारदार चाकूने आकाश उर्फ बाबू कोळी, त्याचा भाऊ, तीन अल्पवयीन व दोन साथीदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच आकाश उर्फ बाबू कोळी भाऊ व तीन अल्पवयीन आणि त्याचे दोन साथीदारांनी त्यांच्याकडे असणाऱ्या पिस्तुलातून पाटे यांच्या दिशेने एक राऊंड फायर करून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरून नारायणगाव पोलिसांनी विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button