आता संभाजीराजेंच्या दौर्‍यावेळी होणार कुलाचार, पूजाविधी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा निर्णय | पुढारी

आता संभाजीराजेंच्या दौर्‍यावेळी होणार कुलाचार, पूजाविधी, तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा, तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरातील देवूळ कवायत नियमावलीमुळे सोमवारी (दि. ९) खासदार संभाजीराजे छत्रपती यांना मंदिरात दर्शन घेण्यास अडथळा निर्माण झाला होता. याविषयी तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने बुधवारी (दि. ११) दिलगीरी व्यक्‍त करत, यापुढे महाराजांच्या उपस्थितीत तुळजामातेचा कुलाचार आणि पूजाविधी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी घटना भविष्यात घडू नये, यासाठी यापुढे जेव्हा संभाजीराजेंचा दौरा असेल, त्यावेळेत करवीर संस्थानतर्फे होणारे कुलाचार, पूजा विधी केली जाणार आहेत. यामुळे संभाजीराजेंचे दर्शनही होईल व देवूळ कवायत नियमावलीचे पालनही होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांना सोमवारी देवीच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन न घेता आल्याने संतप्‍त भावना व्यक्‍त होत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर मंदिर संस्थानने हे पत्रक काढून या विषयावर पडदा टाकला आहे.

Back to top button