जर्मनीत बाप्पा मोरया! | पुढारी

जर्मनीत बाप्पा मोरया!

दिगंबर दराडे
पुणे : जर्मनीची राजधानी बर्लिन या ठिकाणी मराठी मंडळाने तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून दीड एकर जागेवर गणपती मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराचे काम जोरात सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या कामाचा आढावा घेतला. तसेच मंदिराच्या कामाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

जर्मनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवीन बांधण्यात येत असलेल्या गणपती मंदिराची माहिती देताना भारतीय नागरिक.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच बर्लिनला भेट दिली. त्यावेळी मराठी बांधवांनी मोदींची भेट घेतली. पुण्यातील उद्योजक भरत गिते हेही उपस्थित होतेे. गिते यांनी बर्लिनमध्ये बांधण्यात येणार्‍या गणपती मंदिरासाठी विशेष मदत केली आहे. मराठी बांधवांनी युरोपमधील सर्वांत मोठे गणेश मंदिर बनवण्याची योजना आखली आहे.

Market : सेन्सेक्स घसरला, रुपया निचांकी पातळीवर, सोने आणखी महागले!

या मंदिराचा मुख्य दरवाजा राजगोपुरमवरून आणला आहे. 250 हून अधिक हस्तकला मूर्तींसह तो 18 मीटरपेक्षा जास्त उंच आहे. हे मंदिर भारतीय डायस्पोरा पद्धतीने बांधले जात आहे. मराठी मित्र बर्लिनचे सदस्य मंदिराच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
एक समुदाय म्हणून वैयक्तिक आणि संयुक्तपणे योगदान देत आहेत.

संजय राऊतांविरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नीची अब्रुनुकसानीची तक्रार

मराठी मित्र बर्लिनचे रोहित प्रभू (सांगली) आणि दीपक पाटील (कोल्हापूर) हे देखील मंदिराच्या कार्यकारिणीवर आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्या फक्त एक आठवडा आधी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी जागतिक शांतता, विशेषत: पूर्व युरोपमधील युद्धकाळात जागरूकता निर्माण करण्यासाठी बर्लिनला भेट दिली होती. त्यांनी मंदिराला भेट देऊन प्रगती पाहिली. जर्मनीत स्थलांतरित झालेल्या समुदायाच्या सदस्यांच्या प्रयत्नांमुळे हे मंदिर उदयास येत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे, बर्लिनमध्ये भारतीयांना आता प्रार्थनास्थळ, सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि उत्सव होत आहेत. बर्लिन सिनेटनेदेखील एक प्रमुख स्थान म्हणून त्यास पाठिंबा दिला आहे.

हेही वाचलत का?

संशोधन : चंद्रावरील माती करू शकते ऑक्सिजन, ऊर्जेची निर्मिती

देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम; सक्रिय रुग्णसंख्या २० हजारांवर

दिव्यांग मुलाला इंडिगो विमानात प्रवेश नाकारला, म्हणे मुलाचे वर्तन सामान्य नाही! (पहा व्हिडिओ)

Back to top button